बातम्या

राज्यातील काही भागात पावसाला सुरुवात

Rain has started in some parts of the state


By nisha patil - 6/23/2023 4:23:50 PM
Share This News:



 यंदा मान्सून चांगलाच लांबला आहे. मान्सूनमुळे पेरण्या रखडल्यानं बळीराजा चिंतेत आहे. आजपासून राज्यात पावसाला सुरुवात होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे अद्यापही राज्यातील काही भागांत शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत असून, बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. नवी मुंबईत पावसाची हजेरी नवी मुंबईत पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे उकड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

आज सकाळी नवी मुंबईत अचानक पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे काही जणांची तारंबळ उडाली, तर काही जणांनी पावसात भिजण्याचा आनंद घेतला.


राज्यातील काही भागात पावसाला सुरुवात