शैक्षणिक
डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या राज निकमची बल्गेरिया येथे रिसर्च इंटर्नशिपसाठी निवड
By nisha patil - 12/3/2025 5:59:21 PM
Share This News:
डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या राज निकमची बल्गेरिया येथे रिसर्च इंटर्नशिपसाठी निवड
कसबा बावडा, १२ मार्च २०२५: डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी राज निकम याची युरोपियन कमिशनच्या "इंटरनॅशनल समर इंटर्नशिप प्रोग्रॅम" अंतर्गत बल्गेरिया येथील रिसर्च इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे.
राज निकम ६ आठवड्यांसाठी "टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ सोफिया" येथे ऑगमेंटेड रिअॅलिटी, ऍनिमेशन, ध्वनी विश्लेषण यांसारख्या संशोधन प्रकल्पांवर काम करणार आहे. कठोर चाचण्या आणि ऑनलाईन मुलाखती पार करत त्याने ही प्रतिष्ठित फेलोशिप मिळवली आहे.
या निवडीसाठी डॉ. अमरसिंह जाधव, प्रा. राधिका ढणाल आणि प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, तसेच इतर मान्यवरांनी राजचे अभिनंदन केले.
डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या राज निकमची बल्गेरिया येथे रिसर्च इंटर्नशिपसाठी निवड
|