बातम्या

भाजपच्या पोष्टरमधून राज ठाकरेंना वगळले..।

Raj Thackeray dropped from BJP post


By nisha patil - 4/27/2024 6:46:22 PM
Share This News:



कोल्हापूर : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत मनसेच्या राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांना बिनशर्त पाठींबा दिला. व संपूर्ण महाराष्ट्रात मनसेचे कार्यकर्ते कामाला लागले. सभा घेणे, संपर्क दौरे, भेटीगाठी,पै पाहुणे शी संपर्क साधून मतदानासाठी  जोडणी लावली.
           

एवढे सगळे असताना मनसेचे कोल्हापूर जिल्हयातील पदाधिकारी हे महायुतीच्या सभेला उपस्थिती लावून झालेला इतिवृत्तांत आपल्या पदाधिकारी यांना सभेतील माहिती दिली जात असे. न्यूज चॅनेल च्या कार्यक्रमांमध्ये देखील मनसे पदाधिकारी जोमाने महाविकास आघाडीवर तुटून पडून जिवंत हिंदुत्वाचा नारा कोल्हापूरच्या मनात पेटवत आहेत. एवढे सगळे मनसे करत असताना महायुतीच्या दोन्ही उमेदवारांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना योग्य ती वागणूक दिली जात नाही.
       

 कोल्हापूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची सभा घेण्याची नियोजन नेतेमंडळी व उमेदवार यांचेकडून सुरू असताना या दुजाभावामुळे मनसेचे कार्यकर्ते नाराजी व्यक्त करत आहेत. तसेच शनिवारी होणाऱ्या मोदींच्या सभेला मनसे व्यासपीठावर उपस्थित राहणार ? की नाही ? असा संभ्रम निर्माण झाला आहे.
 

यापुढे दोन्ही उमेदवार मनसेच्या पदाधिकाऱ्यांना योग्य मानपान देणार की असेच अपमानास्पद वागणूक देऊन राज ठाकरेंच्या सन्मानाच्या वागणुकीच्या आदेशाला काळीमा फासणार ? असा संतप्त सवाल मनसेच्या गोटातून व्यक्त होत असल्याचे समजते. 
       

अटीतटीच्या लढाईमध्ये मनसेच्या या निर्णयाचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसतो की काय ? अशी गंभीर परिस्थिती जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघांमध्ये निर्माण झालेली आहे.


भाजपच्या पोष्टरमधून राज ठाकरेंना वगळले..।