बातम्या

राज ठाकरेंचा जाहीर सभेतून अजित पवारांना टोला

Raj Thackerays challenge to Ajit Pawar in a public meeting


By nisha patil - 7/25/2024 2:32:19 PM
Share This News:



मुंबईतील वांद्रे भागातील रंगशारदा सभागृहात मनसेचा मेळावा होत आहे. या मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संबोधित केलं आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर बोलताना राज ठाकरे यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे. लाडकी बहीण आणि लाडका भाऊ…. अहो लाडकी बहीण आणि भाऊ एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते. योजना कशाला पाहिजे त्यासाठी…., असं म्हणत राज ठाकरे यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.
 

रंगशारदा सभागृहात होत असलेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी विविध विषयांना स्पर्श केला. मराठी उद्योजकांवर राज ठाकरेंनी भाष्य केलं. राज्यातील प्रश्न आहेत. त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. हेच विधानसभेतील तुमचं कँपेन असलं पाहिजे. एकमेकांना शिव्या द्यायच्या आणि शिव्या देत लोकांचं लक्ष विचलीत करायचं आणि निवडणूका करायच्या. हाताला काही लागणार नाही, असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.


राज ठाकरेंचा जाहीर सभेतून अजित पवारांना टोला