बातम्या
राजारामपुरी पोलिसांची गांजाविरोधी मोहीम सुरच
By nisha patil - 11/2/2025 8:26:33 PM
Share This News:
राजारामपुरी पोलिसांची गांजा विरोधी मोहीम धडकपणे सुरू आहे. आज पुन्हा एकदा गांजा विक्री करणाऱ्या एकास अटक करण्यात आलीय. त्याच्याकडून सुमारे 34 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय.
राजारामपुरीतील जनता बाजार चौकात आकाश सुनील रेणके हा संशयित आरोपी गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार जनता बाजार चौकात सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याची अंग झडती घेतली असता 28 हजार 750 रुपये किमतीचा एक किलो 150 ग्रॅम गांजा सापडला. त्याच्याकडून गांजा व सहा हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण 34 हजार 750 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय.
ही कारवाई राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह पथकाने केलीये.
राजारामपुरी पोलिसांची गांजाविरोधी मोहीम सुरच
|