राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व; शाहू मिलमध्ये 6 ते 14 मे या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Gratitude Festival; Organized various programs at Shahu Mill from 6th to 14th May


By nisha patil -
Share This News:



कोल्हापूर प्रतिनिधी राजर्षी छत्रपती शाहू महाराज  कृतज्ञता पर्वानिमित्त 6 मे  ते 14 मे 2023 या कालावधीत शाहू मिलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कृतज्ञता पर्वात आयोजित सर्व उपक्रम लोकसहभागातून यशस्वी करुया, शाहू मिलमध्ये एकाच ठिकाणी आयोजित सर्व कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून राजर्षी शाहू महाराजांप्रती कृतज्ञता व्यक्त करुया, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. 6 मे 1922 रोजी शाहू महाराजांनी देह ठेवला होता. यावर्षी या घटनेला 101 वर्ष पूर्ण होत आहेत.
महाराजांनी दूरदृष्टीने निर्माण केलेले कोल्हापूर हे आपल्या देशासाठी सर्वांगीण विकासाचे मापदंड ठरले आणि सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन घडविण्यासाठी पथदर्शी ठरले. महाराजांच्या या विचार आणि कार्याला उजाळा देण्यासाठी मागील वर्षीपासून कृतज्ञता पर्व साजरे केले जात आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या विचार आणि कार्याला उजाळा देण्यासाठी या स्मृती शताब्दी वर्षपूर्ती निमित्त येत्या 6 मे स्मृती दिनापासून ते 14 मे 2023 या कालावधीत शाहू मिलमध्ये 'राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व 2023' साजरे करण्यात येणार आहे. या ठिकाणी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांनी दिली.


Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Gratitude Festival; Organized various programs at Shahu Mill from 6th to 14th May