बातम्या
राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणानुबंध आदर्शवत:डॉ श्रीधर शिंदे
By nisha patil - 6/12/2023 4:25:14 PM
Share This News:
राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणानुबंध आदर्शवत:डॉ श्रीधर शिंदे
शहाजी महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
कोल्हापूर:राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणानुबंध खूप जिव्हाळ्याचे आणि जगामध्ये आदर्शवत असे होते,शाहू महाराजांचे लोक कल्याणाचे विचार बाबासाहेबांनी संविधानातून सर्वांपर्यंत पोहोचवले असे प्रतिपादन मिरज महाविद्यालयातील इतिहास विभागाचे प्राध्यापक डॉ.श्रीधर शिंदे यांनी केले.
दसरा चौक येथील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात भारतीय घटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.छत्रपती शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणानुबंध या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
डॉ.शिंदे म्हणाले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पाच वेळा भेट झालेली होती. त्यांच्यामध्ये आठ वेळा पत्रव्यवहार झालेला होता.या सर्वांमधून बाबासाहेबांचा आणि शाहू महाराजांचा ऋणानुबंध आपल्याला स्पष्ट करता येतो.
कोलंबिया विद्यापीठातून भारतात परतल्यानंतर शाहू महाराज मुंबईतील परळ कॉलनीत बाबासाहेबांना भेटावयास केले होते गेले होते.त्यावेळी बाबासाहेब म्हणाले, महाराज आम्हीच तुमच्या भेटीसाठी आलो असतो. त्यावेळी त्यांना शाहू महाराज म्हणाले आम्ही परंपरेने राजे आहोत पण तुम्ही ज्ञानाचे राजे आहात. दुसऱ्या भेटीत शाहू महाराजांनी बाबासाहेबांची कोल्हापूरात जंगी मिरवणूक काढून त्यांचा सत्कार केला. माणगाव परिषद आणि नागपूर परिषदेमध्ये बाबासाहेबांना पुढे आणण्यात आणि दलित समाजाला त्यांचा नेता मिळवून देण्यात शाहू महाराजांनी मोठी भूमिका बजावली होती. बाबासाहेबांच्या एकूण व्यक्तिमत्व विकासामध्ये शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड ,केळुसकर गुरुजी यांचे मोठे योगदान आहे.
शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवाळ्याच्या संबंधाप्रमाणेच मराठा समाज आणि दलित समाज एकत्रित असणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण म्हणाले, फुले शाहू आंबेडकर यांचे विचार मुळातून समजून घेणे गरजेचे आहे. या नेत्यांचे पुरोगामी विचारच समाज विकास साठी उपयुक्त आहेत.
स्वागत व प्रस्ताविक इतिहास विभाग प्रमुख डॉ.सुरेश शिखरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ.शिवाजी जाधव यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. पी.के.पाटील यांनी केले.महाविद्यालयातील शाहू क्लब, आय क्यू एस सी विभाग आणि इतिहास विभाग यांच्या वतीने या व्याख्यानाचे आयोजन केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील ग्रंथसंपदेचे ग्रंथ प्रदर्शन शिवाजी ग्रंथालयात संपन्न झाले.
या सर्व उपक्रमास शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे , मानद सचिव श्रीमती संगीता विजयराव बोंद्रे यांचे प्रोत्साहन मिळाले.महाविद्यालयाचे अधीक्षक मनीष भोसले, डॉ. आर. डी. मांडणीकर ग्रंथपाल डॉ.पांडुरंग पाटील ,सर्व, प्राध्यापक, प्रशासकीय स्टाफ, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणानुबंध आदर्शवत:डॉ श्रीधर शिंदे
|