बातम्या
राजे फाउंडेशन व जिजाऊ समितीने विविध उपक्रमांतून महिलांना मिळाले व्यासपीठ श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे
By nisha patil - 3/13/2024 4:40:53 PM
Share This News:
कागल,प्रतिनिधी.राजे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ समितीने विविध उपक्रमांतून महिलांना चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले.असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या संचालिका व शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांनी केले.
येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी आयोजित महामिनिस्टर कार्यक्रमाच्या विजेत्यांना बक्षीस वितरणवेळी त्या बोलत होत्या. शितल तिप्पे प्रथम क्रमांकासाठी च्या मानाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या. इतर विजेत्यांमध्ये अश्विनी करिकट्टी,प्राजक्ता मोहिते,सानिका हाळभावी मोनिका कवटे वैशाली गाडेकर यांचा समावेश आहे. अमृत चव्हाण यांनी सुत्रसंचलन केले.
श्रीमती घाटगे पुढे म्हणाल्या, महिलांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत स्वतःच्या आवडीनिवडी जपाव्यात. सकस आहार घ्यावा. नियमित व्यायाम व आरोग्य तपासणी करून घ्यावी.कार्यक्रमास डोंगरी विकास समितीच्या सदस्या विजया निंबाळकर, सुधा कदम,शितल घाटगे, मोनिका इंगळे , किरण कोराणे,रेवती बरकाळे, अश्विनी भोसले, यशोदा हजारे, अनिता संकपाळ, उल्का तेलवेकर यांच्यासह राजमाता जिजाऊ समितीच्या पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
राजे फाउंडेशन व जिजाऊ समितीने विविध उपक्रमांतून महिलांना मिळाले व्यासपीठ श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे
|