बातम्या

राजे-मंडलिक गट यापुढेही समन्वयाने काम करेल... खा.संजय मंडलिक*

Raje Mandlik group will continue to work in coordination


By nisha patil - 2/4/2024 9:02:41 PM
Share This News:



कागल ,प्रतिनिधी. गटातटाच्या राजकारणासाठी प्रसिद्ध असलेल्या कागल तालुक्यात राजे समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली भाजपची गावागावात मजबूत बांधणी झाली आहे.राजे व मंडलिक गटाची युती गत लोकसभा निवडणुकीपासून पाच वर्षांपूर्वीच झाली आहे. नुकत्याच झालेल्या बिद्रीच्या निवडणुकीतही आम्ही एकत्र होतो. हाच एकोपा कायम ठेवत राजे - मंडलिक गट येत्या काळात समन्वयाने काम करेल. असे प्रतिपादन कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांनी केले.

   येथे कागल गडहिंग्लज  उत्तूर  विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे  होते.

   खासदार मंडलिक पुढे म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा वारसा स्व.सदाशिवराव मंडलिक व स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी प्रत्यक्ष कृतीतून चालवला.समरजितसिंह घाटगे  व आम्ही तोच वारसा डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करीत आहोत.

अध्यक्षीय मनोगतात राजे समरजीतसिंह घाटगे  म्हणाले गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने विकासात्मक जे काम केले आहे त्या तुलनेत  यूपीए सरकारने दहा टक्के सुद्धा काम केलेले नाही. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी खा. संजय मंडलिक यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊया.

व्यासपिठावर शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे,राजे बँकेचे अध्यक्ष एम.पी.पाटील,रमेश माळी, विरेंद्र अनंत फर्नांडिस संजय पाटील,विवेक कुलकर्णी,प्रितम कापसे,विठ्ठल पाटील,प्रकाश पाटील,दत्तामामा खराडे, शाहू ग्रुप मधील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र तारळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
स्वागत शाहूचे संचालक युवराज पाटील यांनी केले.प्रास्तविक  प्रा.सुनिल मगदूम यांनी केले.आभार यशवंत ऊर्फ बाॕबी माने यांनी मानले.


राजे-मंडलिक गट यापुढेही समन्वयाने काम करेल... खा.संजय मंडलिक*