बातम्या

राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात त्यांचे भव्य स्वागत

Raje Samarjitsinh Ghatge gave a grand welcome to NCP Sharad Chandra Pawar group


By nisha patil - 7/11/2024 7:56:51 PM
Share This News:



भव्य शक्तीप्रदर्शन द्वारे कृष्णात पाटील  मौ. सांगाव यांचे असंख्य कार्यकर्त्यांसह  कमबॅक 

 राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात त्यांचे भव्य स्वागत 

 यापुढे राजे समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली जोमाने काम करणार.... 

 कृष्णात पाटील 

कसबा सांगाव प्रतिनिधी.मौजे सांगाव ता. कागल येथील मार्केट कमिटीचे माजी सभापती व मौजे सांगाव चे माजी सरपंच कृष्णात पाटील यांनी आपले  बंधू  राम पाटील,हरी पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांसह  पालकमंत्री हसन मुश्रीफ गटातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात भव्य शक्तीप्रदर्शन द्वारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या मूळ पक्षात जोरदार कमबॅक केले. राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात  त्या सर्वांचे भव्य स्वागत केले.

या प्रवेशानंतर  जाहीर सभेत बोलताना कृष्णात पाटील म्हणाले,गेली पस्तीस वर्षे पालकमंत्र्यांसह ज्येष्ठ नेत्यांची  पालखी प्रामाणिकपणे वाहिली.प्रसंगी मातृवियोगाचे दुःख बाजूला ठेवून आम्ही तिघे भाऊ मतदानावेळी बुथवर ठाण मांडून बसलो. त्यांच्यावर एकतर्फी प्रेम करत प्रामाणिकपणे त्यांची सेवा केली.त्यांनी मात्र आमच्या बाबतीत विश्वासाचे राजकारण केले नाही. आम्हाला सातत्याने थांबवून अन्याय केला. राजे समरजितसिंह घाटगे हे एक अभ्यासू निष्कलंक , उच्च शिक्षित युवा नेतृत्व असून, कागल तालुक्याच्या विकासाचे एक व्हिजन घेऊन ते कार्यरत आहेत. त्यांच्या समाजभिमुख कामावर आकर्षित होऊन आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे यापुढे त्यांच्या नेतृत्वाखाली निष्ठेने आम्ही काम करीन.

 कागलमध्ये विकासगंगा नव्हे पालकमंत्र्यांसह चार ठेकेदारांची भ्रष्टाचारगंगा 

समरजितसिंह घाटगे

गेल्या पाच वर्षात सात हजार कोटी रुपयांची विकासकामे केल्याची माहिती पालकमंत्र्यांनी विकासगंगा पुस्तकातून दिली आहे.मात्र कागल गडहिंग्लज-उत्तूर  विभागामध्ये यामधील अनेक कामे निकृष्ट तर काही झालीच नसल्याचे फलक गावोगावी नागरिक ग्रामस्थांकडून झळकत आहेत.यासाठीचा निधी पालकमंत्री व त्यांच्या मर्जीतील चार ठेकेदारांच्या खिशात गेला आहे.त्यामुळे कागल,गडहिंग्लज -उत्तूरमध्ये ही विकासगंगा नव्हे पालकमंत्र्यांसह चार ठेकेदारांची भ्रष्टाचारगंगा आहे.

 ते पुढे म्हणाले,कृष्णात पाटील यांच्यासह प्रवेश केलेले सर्वजण हे मूळचे शरद पवारसाहेब यांचे कार्यकर्ते आहेत.त्यामुळे ते मूळच्या गटात परत आले आहेत.त्यांना भावाप्रमाणे साथ देऊन त्यांचा योग्य तो मानसन्मान राखू.माजी आमदार स्व. शामराव पाटील तथा बापूजी यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या पालकमंत्र्यांना त्यांच्या गद्दारीचे उत्तर येत्या वीस तारखेला या परिसरातील जनता मतपेटीतून देईल.

जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरे म्हणाल्या, गत वेळी जनता दलाने मदत करून सुद्धा पालकमंत्र्यांनी श्रीपतराव शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना वेठीस धरले. त्यामुळे समरजीतराजेंच्या परिवर्तनाच्या लढाईत गडहिंग्लसह उत्तूरकर कागलकरांच्या दोन पावले पुढे राहतील.

यावेळी गोकुळचे माजी चेअरमन रणजितसिंह  पाटील,दिलीप पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
 कार्यक्रमास सागर कोंडेकर, संभाजी भोकरे, बाजीराव खाडे,शिवानंद माळी,दयानंद कांबळे,यशराज घाटगे,सुरेश कांबळे,अश्विनी व्हरांबळे आदि मान्यवर उपस्थित होते.

स्वागत शाहूचे संचालक युवराज पाटील यांनी तर आभार अमर शिंदे यांनी मानले.

 भव्य मिरवणूक  व ओसंडून वाहणारा उत्साह 

सभेपूर्वी रणदिवेवाडी येथून सांगावपर्यत  सजवलेल्या गाडीतून समरजितसिंह घाटगेंसह पाटील बंधूंची प्रमुख मार्गावरुन रॅली काढली.सभास्थळी पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.घाटगे  यांनी पाटील बंधूच्या गळ्यात प्रवेशाचा स्कार्फ घालताच या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत प्रचंड घोषणाबाजी व फटाक्यांचे आतषबाजी केली.

 विश्वासाघाताचे दुसरे नाव हसन मियालाल मुश्रीफ- सुरेश कुराडे 

राष्ट्रीय काँग्रेसचे सुरेश कुराडे म्हणाले, पालकमंत्र्यांनी राजकीय स्वार्थासाठी स्वर्गीय विक्रमसिंहराजे, सदाशिवराव मंडलिक, शामराव पाटील, बाबासाहेब कुपेकर, श्रीपतराव शिंदे यांच्यासह त्यांना सर्व सत्ता व पदे देणाऱ्या शरद पवार साहेब यांच्याशी विश्वासघात केला.त्यामुळे जिल्ह्यात विश्वासघाताचे दुसरे नाव म्हणून हसन मियालाल मुश्रीफ यांचा उल्लेख करावा लागेल.


राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात त्यांचे भव्य स्वागत