बातम्या
राजे विक्रमसिंह घाटगे "आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी" प्रस्ताव पाठवा.... सौ नवोदिता घाटगे यांचे आवाहन...
By nisha patil - 7/23/2023 3:11:16 PM
Share This News:
कागल / प्रतिनिधी. कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक,माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या शिक्षकांना सहकारातील आदर्श स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या नावाने "आदर्श शिक्षक पुरस्कार" दिला जातो. सन 2023-24 या वर्षासाठी ही हा पुरस्कार दिला जाणार आहे. तरी या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी इच्छुकांनी आपले प्रस्ताव दिनांक 20 जुलै 2023 पर्यंत पाठवावेत असे आवाहन राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
शाहू ग्रुपच्या मार्गदर्शिका व शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे, शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ.नवोदिता घाटगे यांच्या संकल्पना व प्रेरणेतून गेल्या तीन वर्षांपासून या पुरस्काराची सुरुवात केली आहे .
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे व इतरांनीही त्यांच्या कामाचा आदर्श घ्यावा. या उद्देशाने जिल्ह्यातील कर्तृत्ववान शिक्षकांना राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.
सन 2023-24 च्या पुरस्कारांची घोषणा स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या 75 व्या जयंतीदिनी येत्या 28 जुलै 2023 रोजी करण्यात येणार आहे.
तरी शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट, उaल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांनी गुरुवार दि. 20 जुलै 2023 रोजी पर्यंत विहित नमुन्यात आपले प्रस्ताव श्रीमंत जयसिंगराव घाटगे वि.मं हायस्कूल व ज्यू.कॉलेज (शिक्षण संकुल) कागल येथे श्री. दिलीप निकम (सर) यांच्याकडे सादर करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
राजे विक्रमसिंह घाटगे "आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी" प्रस्ताव पाठवा.... सौ नवोदिता घाटगे यांचे आवाहन...
|