बातम्या
कोल्हापूरात मराठा आरक्षणासाठी राजेंद्र तोरस्कर यांचे उपोषण सुरू
By nisha patil - 3/10/2023 4:02:21 PM
Share This News:
कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी राजेंद्र तोरस्कर यांनी दसरा चौकात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण सुरू केलं आहे. 13 ऑक्टोबर पर्यंत निर्णय न झाल्यास पाणीही न घेण्याचा निर्धार तोरस्कर यांनी केला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी राजेंद्र तोरस्कर यांनी दसरा चौकात उपोषण सुरू केलं आहे. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीवर ते ठाम असून 13 ऑक्टोबर पर्यंत निर्णय न झाल्यास पाणीही न घेण्याचा निर्धार तोरस्कर यांनी केला आहे.
यावेळी हिंदू एकता संघटनेचे माजी अध्यक्ष अण्णा पोतदार ,हिंदू महासभा जिल्ह्या अध्यक्ष मनोहर सोरप ,प्रमोद घोरपडे,संजय कुलकर्णी ,जितेंद्र पाटील,विक्रम माने ,सुनील पाटील ,साधना कोठावळे आदी उपस्थित होते
कोल्हापूरात मराठा आरक्षणासाठी राजेंद्र तोरस्कर यांचे उपोषण सुरू
|