बातम्या

उत्पन्न वाढीसाठी महापालिकेच्या भूखंडाचा विकास करा : राजेश क्षीरसागर

Rajesh Kshirsagar


By nisha patil - 12/21/2023 7:00:34 PM
Share This News:



उत्पन्न वाढीसाठी महापालिकेच्या भूखंडाचा विकास करा : राजेश क्षीरसागर 

कोल्हापूर महानगरपालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी महापालिकेच्या कोल्हापूर शहरात असणाऱ्या भूखंडांचा विकास करा अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महापालिका आयुक्त के मंजू लक्ष्मी यांच्यासह अधिकाऱ्यांना दिल्या. आज राजेश क्षीरसागर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह टीमलाईवाडी येथील आयटी पार्क साठी आरक्षित असलेला भूखंड आणि आय आर बी कंपनीला दिलेली मात्र सध्या महापालिकेच्या ताब्यात असलेल्या इमारतीची पाहणी केली यावेळी ते बोलत होते.

नऊ ते दहा वर्षांपूर्वी आयआरबी कंपनीला महापालिकेने ही जागा देऊ केली होती मात्र राज्य शासनाने टोलचे सर्व पैसे आयआरबी कंपनीला दिल्यानंतर महापालिकेकडे जागा हस्तांतरित झाले आहे मात्र सध्या नऊ वर्षांपासून ही पूर्ण इमारत आणि परिसरातील जागा धुळकात पडत असून या ठिकाणी अवैद्य धंदे सुरू आहेत.त्यामुळे ही जागा बीओटी तत्त्वावर वापरून महापालिकेचे उत्पन्न वाढल्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा विचार करता येऊन त्यांना न्याय देता येईल.यासह शिंगोशी मार्केटच्या समस्या,  कामगार चाळ बैठक लावण्या संदर्भात यावेळी चर्चा केली.तसेच याबाबत लवकरात लवकर अहवाल सादर करण्याच्या सूचना क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत..


उत्पन्न वाढीसाठी महापालिकेच्या भूखंडाचा विकास करा : राजेश क्षीरसागर