बातम्या

स्वातंत्र्य दिनानिमित्त राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते कोल्हापूरातील विविध विकासकामांचे उद्घाटन

Rajesh Kshirsagar inaugurated various development works in Kolhapur on the occasion of Independence Day


By nisha patil - 8/14/2024 6:01:56 PM
Share This News:



कोल्हापूर, १४ ऑगस्ट २०२४: स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते १५ ऑगस्ट २०२४ रोजी शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. सकाळी ९.३० वाजता मुलभूत सोई सुविधा योजनेतून मंजूर सुबराव गवळी तालीमीच्या इमारत बांधकामाचा (रु.२५ लाख) शुभारंभ होईल. सकाळी ११ वाजता महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत लक्ष्मी गल्ली व दत्त गल्ली पापाची तिकटी येथील रस्त्याचे काँक्रीटीकरण केले जाईल. यानंतर श्री. राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून रु. १००.३३ कोटीतील रस्त्यांच्या विकासकामांचा शुभारंभ होईल. सकाळी ११.३० वाजता अॅपल हॉस्पिटल ते वसंतनगर ते जिल्हा परिषद कंपाऊंड, ११.४५ वाजता गोल्ड जिम ते सदरबाजार चौक आणि दुपारी १२ वाजता रसिका हॉटेल ते जाधववाडी रिंगरोड या कामांचे उद्घाटन होईल.


स्वातंत्र्य दिनानिमित्त राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते कोल्हापूरातील विविध विकासकामांचे उद्घाटन