राजकीय
कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश क्षीरसागर यांचे पारडे जड पण एक्झिट पोलनुसार राजेश लाटकर यांच्या विजयाचे संकेत
By Administrator - 11/22/2024 12:34:35 PM
Share This News:
कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश क्षीरसागर यांचे पारडे जड पण एक्झिट पोलनुसार राजेश लाटकर यांच्या विजयाचे संकेत
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच रंजक परिस्थिती निर्माण झालीय. महाविकास आघाडीमध्ये या ठिकाणी तिकीट वाटपावरून झालेला वाद. मधुरीमाराजे यांची माघार त्यांनतर राजेश लाटकर यांची अपक्ष उमेदवारी अशा नाट्यमय घडामोडी नंतर अखेर राजेश लाटकर विरुद्ध शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर अशी लढत झाली.
उद्या निवडणुकिचा निकाल जाहीर होणार आहे.मात्र एक्झिट पोलच्या मतानुसार राजेश लाटकर हे कोल्हापूर उत्तर चे संभाव्य आमदार होतील असा अंदाज लावला जात आहे.
एकंदरीत जर पाहायला गेलं राजेश क्षीरसागर यांचं या ठिकाणी पारडं जडच राहिला आहे. शहरातील पेठांमध्ये त्यांचं वर्चस्व आहे. तर तर दुसरीकडे रमणमळा ,कसबा बावडा ,विचारे माळ सह अन्य भागात लाटकर यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे ही लढत अतिशय खडाजंगी होणार असल्याचे चित्र पाहायला मिळतय. खरं तर लाटकर यांच्या अपक्ष उमेदवारीनंतर क्षीरसागर यांना निवडणूक सोपी झाल्याचं बोलले जात होतं. मात्र काँग्रेसचा पाठिंबा महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या साथीमुळे लाटकर यांचं बळ वाढल्याचे पाहायला मिळतंय.त्यामुळे क्षीरसागर यांना ही निवडणूक जड गेल्याचे चित्र स्पष्ट होतय. या ठिकाणी सध्या तरी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांचे पारडं जड असल्याचं चिन्ह दिसत असलं तरी क्षीरसागर हे कधी वरचढ ठरतील हे सांगता येत नाही.
कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश क्षीरसागर यांचे पारडे जड पण एक्झिट पोलनुसार राजेश लाटकर यांच्या विजयाचे संकेत
|