राजकीय
कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश क्षीरसागर यांची विजयी घोडदौड! राजेश लाटकर यांचा पराभव
By nisha patil - 11/23/2024 1:22:30 PM
Share This News:
कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश क्षीरसागर यांची विजयी घोडदौड! राजेश लाटकर यांचा पराभव
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ, जो आधीपासूनच वादग्रस्त ठरला होता, त्यात महायुतीचे एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी मोठा विजय मिळवला आहे.
प्रारंभापासूनच कडव्या लढतीत असलेल्या क्षीरसागर यांनी शेवटच्या फेरीपर्यंत आपली आघाडी कायम ठेवत काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांचा पराभव केला. क्षीरसागर यांच्या विजयाने महायुतीला मोठा दिलासा मिळाला असून, कोल्हापूर उत्तरमध्ये शिवसेनेच्या (शिंदे गट) वाढत्या प्रभावाचेही प्रदर्शन घडले आहे.
या विजयाने मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली असून, क्षीरसागर यांचा मजबूत गड पुन्हा उभा राहिला आहे. "उत्तरच उत्तर फक्त राजेश क्षीरसागरच", अशीच या निवडणुकीची कथा ठरली आहे.
कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश क्षीरसागर यांची विजयी घोडदौड! राजेश लाटकर यांचा पराभव
|