बातम्या
राजेश लाटकर नॉट रिचेबल काँग्रेसच टेन्शन वाढलं.
By nisha patil - 4/11/2024 1:36:58 PM
Share This News:
राजेश लाटकर नॉट रिचेबल काँग्रेसच टेन्शन वाढलं.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसकडून राजेश लाटकर यांना तिकीट जाहीर झालं होतं.मात्र काँग्रेस पक्षातीलच वाढत्या विरोधामुळे त्यांचे तिकीट कापून मधुरिमा राजे छत्रपती यांना देण्यात आलं. त्यांनतर नाराज झालेल्या राजेश लाटकर यांनी निवडणूक लढण्यावर ठाम राहत अपक्ष निवडणूक अर्ज दाखल केला.
राजेश लाटकर यांच्या बंडखोरीमुळे महाविकासाकडे तोट्यात जाऊ शकते यासाठी काँग्रेसचे नेते व आमदार सतेज पाटील यांनी त्यांची मनधरणी सुरू केली.खा.शाहू छत्रपती, मालोजीराजे ,मधुरीमाराजे यांनीही लाटकर यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केलेत. आज सोमवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे.मात्र सकाळपासूनच त्यांचे दोन्हीही मोबाईल बंद आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या गोटामध्ये चांगलाच टेन्शन वाढलंय.जर का दुपारी तीन वाजेपर्यंत लाटकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तर त्यांची उमेदवारी कायम राहणार आहे.
त्यामुळे लाटकर हे अपक्ष निवडणूक लढण्यावर ठामच असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अगदी शेवटच्या क्षणी विद्यमान आमदार जयश्रीताई जाधव यांनी सोडलेली काँग्रेसची साथ व राजेश लाटकर यांची अपक्ष लढण्याची भूमिका यामुळे कोल्हापूर उत्तर मध्ये काँग्रेसच टेन्शन चांगलंच वाढलंय.
राजेश लाटकर नॉट रिचेबल काँग्रेसच टेन्शन वाढलं.
|