बातम्या

रजनीकांत यांनी शेअर केला बिग बींसोबतचा फोटो

Rajinikanth shared a photo with Big B


By nisha patil - 10/25/2023 10:30:08 PM
Share This News:



बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि सुपरस्टार रजनीकांत यांचा चाहता वर्ग मोठा आहे. दोघांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. आता लवकरच रजनीकांत आणि अमिताभ बच्चन हे एका आगामी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 33 वर्षानंतर अमिताभ बच्चन आणि रजनीकांत हे स्क्रिन शेअर करणार आहेत. नुकताच रजनीकांत यांनी एक खास फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये बिग बी आणि रजनीकांत a आहे. या फोटोला रजनीकांत यांनी खास कॅप्शन देखील दिलं आहे. 

अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा फोटो शेअर करुन रजनीकांत यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, "33 वर्षांनंतर, मी माझे मार्गदर्शक श्री अमिताभ बच्चन यांच्यासोबत टीजे ज्ञानवेल दिग्दर्शित आगामी थलाइवर 170  मध्ये काम करत आहे. माझे हृदय आनंदाने धडधडत आहे!" चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांनी 1991 मध्ये रिलीज झालेल्या  'हम' या चित्रपटात एकत्र काम केले होते.  मुकुल आनंद यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. त्यानंतर दोघांनी एकत्र काम केलं नाही. आता थलाइवर 170 या चित्रपटात 33 वर्षानंतर रजनीकांत  आणि बिग बी हे. एकत्र काम करणार आहेत.


रजनीकांत यांनी शेअर केला बिग बींसोबतचा फोटो