बातम्या
भारतीय संगणक युगाचे जनक राजीव गांधी: डॉ.शानेदिवाण शहाजी महाविद्यालयात सद्भावना दिनानिमित्त राजीव गांधी यांना अभिवादन
By nisha patil - 8/18/2023 6:23:50 PM
Share This News:
कोल्हापूर: भारतातील संगणक युगाचे जनक म्हणून माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना ओळखले जाते.त्यांनीच दूरदृष्टीने भारतात संगणक व माहिती तंत्रज्ञान सेवांचा प्रारंभ केला असे प्रतिपादन शहाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी केले . श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात राजीव गांधी यांच्या जयंती दिनानिमित्त सद्भावना दिन साजरा करण्यात आला.यानिमित्त महाविद्यालयाचे प्रबंधक मनीष भोसले यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी सद्भावना प्रतिज्ञाचे वाचन केले राजीव गांधी यांच्या जयंतीचे अवचित्य साधून 1993 पासून सबंध देशभर सद्भावना दिन साजरा होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. देशात जातीय सलोखा ,सद्भावना राहिली तरच समाजाचा सर्वांगीण विकास होईल यावर त्यांनी भर दिला. सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
भारतीय संगणक युगाचे जनक राजीव गांधी: डॉ.शानेदिवाण शहाजी महाविद्यालयात सद्भावना दिनानिमित्त राजीव गांधी यांना अभिवादन
|