बातम्या
पन्हाळ्यात राजमाता जिजाऊ जयंती विविध उपक्रमांनी साजरी...
By nisha patil - 1/13/2025 3:22:33 PM
Share This News:
पन्हाळ्यात राजमाता जिजाऊ जयंती विविध उपक्रमांनी साजरी...
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी महिलांना केले मार्गदर्शन...
पन्हाळा प्रतिनिधी , शहाबाज मुजावर, राजमाता जिजाऊ यांची 12 जानेवारी रोजी 427 वी जयंती पन्हाळगडावर साजरी झाली.येतील स्थानिक जिजाऊ ब्रिगेड मार्फत एक दिवस ऐतिहासिक पावनगडाचा सहवास या निमित्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी महिलांना मार्गदर्शन केले तर मोडी लिपीचे अभ्यासक अमित अडसुळे यांनी पावनगडाची माहिती दिली.
Vo: दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील वेगळ्या स्वरूपात राजमाता जिजाऊ जयंती साजरी करणाऱ्या येथील जिजाऊ ब्रिगेडचे कार्य कौतुकास्पद असल्याचे उदगार यावेळी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी काढले.
तसेच पन्हाळगड व पावनगड संदर्भातील संपूर्ण छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास पन्हाळातील स्थानिक महिलांनी स्वतः पायी फिरून पाहिला तसेच आपल्या मनातील शंका इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत व मोडी लिपिक अभ्यासक अमित अडसुळे यांना विचारले त्यांनी त्यांचे प्रश्नांचे समाधानकारक उत्तर दिले.सखोल असा इतिहासाचे धडे महिलांना देण्यात आले सर्व महिला इतिहास ऐकताना भाविक झाल्या होत्य. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष, शरयू लाड, कार्याध्यक्ष ,इंद्रायणी आडनाईक, सचिव सुरेखा भोसले, रेखा भोसले, मधुरा कुराडे, रेखा पाटील, सविता पाटील, अर्पिता भोसले, आरती कुराडे, पल्लवी भोसले, दीपा काशिद, अलका लाड, आर्चना भोसले, रजिया आगा, महिलावर्ग मोठ्या प्रमाणात किल्ले पावनगड इथे उपस्थित होत्या.
पन्हाळ्यात राजमाता जिजाऊ जयंती विविध उपक्रमांनी साजरी...
|