बातम्या

राजमाता जिजाऊ महिला अर्बन सोसायटीचे उद्घाटन दुधोंडी येथे संपन्न

Rajmata Jijau Women Urban Society was inaugurated at Dudhondi


By nisha patil - 10/10/2024 2:39:45 PM
Share This News:



प्रतिनिधी: विनोद शिंगे, कुंभोज दुधोंडी, ता. पलूस येथील स्वातंत्र्य सेनानी पै आनंदराव जाधव फाऊंडेशन संचलित राजमाता जिजाऊ महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. चा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे उद्घाटन माजी खासदार पूनम महाजन यांच्या हस्ते झाले, तर प्रमुख पाहुण्या म्हणून महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक फेडरेशनच्या उपाध्यक्षा सौ. वैशालीताई आवाडे उपस्थित होत्या.

उद्घाटन कार्यक्रमात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश संघटन मंत्री अभिजित पाटील, शिवाजी मगर-पाटील, धोंडीराम शिंदे, सचिनकुमार सावंत, सौ. अनिता मगर-पाटील, तसेच फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सचिन जाधव, सोसायटीच्या चेअरमन सौ. अक्षता जाधव, व्हा. चेअरमन उज्वला नलवडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

या सोसायटीच्या स्थापनेमुळे ग्रामीण महिलांना आर्थिक स्वावलंबनाची एक नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. सोसायटीद्वारे महिलांना लहान व्यवसायांसाठी कर्ज पुरवठा, बचत योजनांमध्ये सहभाग, आणि विविध आर्थिक सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत सुव्यवस्थितरित्या पार पडले असून, मोठ्या संख्येने स्थानिक नागरिकांनी आणि मान्यवरांनी हजेरी लावली.


राजमाता जिजाऊ महिला अर्बन सोसायटीचे उद्घाटन दुधोंडी येथे संपन्न