बातम्या

राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा शासकीय कार्यालयात लावणं बंधनकारक करण्यात यावं शिवशाही फाउंडेशन ची मागणी

Rajmata Jijaus image in government offices


By nisha patil - 2/13/2024 7:41:34 PM
Share This News:



मंगळवार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी शिवशाही फाऊंडेशनच्या वतीनं राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा शासकीय कार्यालयात लावणं बंधनकारक करण्यात यावं यासाठीचे निवेदन खासदार धनंजय महाडिक यांना देण्यात आले.

यावेळी शिवशाही तर्फे  देण्यात येणाऱ्या निवेदनात म्हटले आहे की राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा शासकीय कार्यालयात लावून बंधनकारण करण्यात यावं ही मागणी कोल्हापुरातून सर्वप्रथम करण्यात आली यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेत पाठपुरावा करावा तसेच हे विधेयक मंजूर करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी ही शिवशाहीच्या वतीने करण्यात आली यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी या मागणीचा विचार करण्याची ग्वाही शिवशाही फाउंडेशनला दिली आहे.

या शिष्टमंडळात कार्याध्यक्ष मनीषा घाटगे, युवा महिला संघटक दिशा मांडवकर गौरी कुलकर्णी, हिंदूमहासभेच्या शोभाताई शेलार, शिलाताई माने, जिल्हाध्यक्ष सचिन साळोखे, हिंदूमहासभेचे संदीप सासणे, जयराज राणे, विशाल कांबळे, विजय देसाई, महेश जाधव, महेश कदम, संदीप पाटील, चंद्रकांत कांडेकरी, संजय साळोखे आदी पदाधिकारी सहभागी होते.


राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा शासकीय कार्यालयात लावणं बंधनकारक करण्यात यावं शिवशाही फाउंडेशन ची मागणी