बातम्या
अर्थसंकल्पासंदर्भात राजू शेट्टीचं मोठं वक्तव्य म्हणाले...
By neeta - 1/2/2024 5:43:29 PM
Share This News:
कोल्हापूर : अवघ्या देशाचं अर्थसंकल्पावर लक्ष होत ते अर्थसंकल्प अखेर आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाहीर केलं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी तयार केलेल्या अर्थसंकल्पावर औपचारिकरित्या चर्चा झाली. केंद्रीय मंत्रिमंडळाने अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले, गेल्या 10 वर्षात सरकारला शेतकरी व सामान्यांसाठी काहीही करता आले नाही. तर तीन महिन्याच्या बजेटवर काय अपेक्षा ठेवणार. केंद्राच्या फुटकळ तरतुदी अत्यंत निराशाजनक आहेत. जनतेच्या हाताला काही लागणार नाही. पामतेल आयात केल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे, त्यामुळे हमीभाव पेक्षा दर कमी झाले.
तसेच, राजू शेट्टी पुढे म्हणाले कि, साखर निर्यातीवर बंदी घातल्याने ऊसाला दर मिळत नाही. केंद्र सरकार केवळ किसान पीएम योजनेचे आकडे तोंडावर फेकत आहे. गेल्या वर्षी किती खते विकली? त्याचे बाजार मूल्य किती होते? बाजार मुल्याची किंमत वजा करून पी एम किसान योजनेची वजाबाकी करून आकडेवारी जाहीर करावी. एकीकडे पीएम किसान योजनेतून दिल्यासारखं करायचं आणि रासायनिक खतातून काढून घ्यायचं. केंद्र सरकारमधील काही लोकांचा अहंकार आणि आत्मविश्वास वाढला आहे, अशा शब्दात शेट्टी यांनी अंतरिम बजेटवर टीका केली
अर्थसंकल्पासंदर्भात राजू शेट्टीचं मोठं वक्तव्य म्हणाले...
|