राजकीय
राजू शेट्टींचा वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्याबद्दल घोषणा, शिरोळ विधानसभा निवडणुकीत विजयाची आशा
By nisha patil - 11/13/2024 6:56:13 PM
Share This News:
जयसिंगपूर ( प्रतिनिधी ) शिरोळ विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने स्वाभिमानीचे उमेदवार श्री. उल्हास पाटील यांना पाठिंबा दिल्यामुळे विजयाचा मार्ग सुकर झाला असल्याचे प्रतिपादन राजू शेट्टी यांनी केले.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शिरोळ विधानसभेसाठी स्वाभिमानीचे उमेदवार उल्हास पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर आज जयसिंगपूर येथील स्वाभिमानीच्या कार्यालयात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी यांची बैठक घेऊन प्रचार यंत्रणा गतिमान करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले कि दलित चळवळ व शेतकरी चळवळ एकत्र यावी ही स्वर्गीय शरद जोशी यांचे स्वप्न होते आज शिरोळ तालुक्यातून या ऐतिहासिक गोष्टीस सुरवात झाली आहे.
डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे सामान्य कुटूंबातील लोक देशाच्या सर्वोच्य सभाग्रहात पोहचले आहेत. वंचित व शोषित लोकांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना न्याय देण्यासाठी स्वाभिमानी व वंचित आघाडी एकत्र आल्यास त्याचा लाभ सामान्यांना होणार आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम , तालुकाध्यक्ष संदीप कांबळे , उपाध्यक्ष दिलीप कांबळे , किरण कांबळे , जीवन आवळे गौतम कांबळे यांचेसह वंचित बहुजन आघाडी व स्वाभिमानीचे पदाधिकारी ऊपस्थित होते.
राजू शेट्टींचा वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्याबद्दल घोषणा, शिरोळ विधानसभा निवडणुकीत विजयाची आशा
|