बातम्या
राजू शेट्टींच्या 'आत्मक्लेश ' पदयात्रेला आज पासून सुरूवात
By nisha patil - 10/17/2023 7:12:15 PM
Share This News:
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या हंगामातील प्रति टन 400 रुपये मिळावेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या आक्रोश पदयात्रेला आज शिरोळ तालुक्यातून सुरुवात झाली. यावेळी जागोजागी फुलांचा वर्षाव करत राजू शेट्टी यांच्या पदयात्रेचं शेतकऱ्यांनी स्वागत केलं.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या हंगामातील प्रति टन ४०० रुपये मिळावेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या आक्रोश पदयात्रेला आज शिरोळ तालुक्यातून सुरुवात झाली. चारशे रुपये मिळाल्याशिवाय कारखाने सुरू करू दिले जाणार नाहीत, असा इशारा राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.
गेल्या ऊस गळीत हंगामात साखर कारखान्यांना इथेनॉल व साखरेपासून ज्यादा उत्पन्न मिळाले आहे. त्याचा शेतकऱ्यांना वाटा दिला पाहिजे, अशी स्वाभिमानीची भूमिका आहे. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांना गेल्या आठवड्यात निवेदन देऊन प्रति टन चारशे रुपये अधिक मिळावेत, अशी मागणी केली होती. तथापि जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत साखर कारखानदारांनी अधिकची रक्कम देणे शक्य नाही. कायद्यानुसार एफआरपी दिलेली आहे, असे म्हणत शेतकरी संघटनांची मागणी फेटाळून लावली आहे.
यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांवर आक्रोश आत्मक्लेष पदयात्रा काढण्यात आली या आक्रोश पदयात्राच , 7 नोव्हेंबरला जयसिंगपूर येथे होणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत सांगता होणार आहे. याच परिषदेते हंगामात कोणती भूमिका घ्यायची याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
राजू शेट्टींच्या 'आत्मक्लेश ' पदयात्रेला आज पासून सुरूवात
|