बातम्या

राजू शेट्टींनी मातोश्रीवर दोनवेळा भेट घेऊनही .........

Raju Shetty visited Matoshree twice


By nisha patil - 3/4/2024 7:21:24 PM
Share This News:



हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतेचे उमेदवार म्हणून धैर्यशील माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र माने यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध सुरूच आहे. इतकेच नव्हे तर गेल्या काही दिवसांपासून त्यांची उमेदवारी रद्द केली जाणार अशी सुद्धा चर्चा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून कोणती भूमिका घेतली जाणार? याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू होती.

उद्धव ठाकरे यांना असलेली सहानुभूती लक्षात घेता राजू शेट्टी यांनी दोनवेळा मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती. उद्धव ठाकरे यांनी सांगितले की राजू शेट्टी यांच्यासोबत आमची बोलणी फिस्कटली नाहीत. हातकणंगले हा शिवसेनेचा मतदार संघ आहे. 2019 मध्ये शिवसेनेचा उमेदवार याठिकाणी विजयी झाला होता. कोल्हापूरची जागा श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्यासाठी सोडल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणित पाहता आम्हाला उमेदवार देण्यात यावी अशी मागणी शिवसैनिकांकडून करण्यात आली होती, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र राजू शेट्टी यांना आम्ही पाठिंबा देऊ म्हटलं होतं. मात्र, त्यांनी मशाल चिन्हावर लढावे असा प्रस्ताव त्यांना दिला होता. दुसरी जागा सुद्धा जागा सोडल्यास शिवसैनिकांची नाराजी पडेल याची शक्यता होती. त्यामुळे हातकणंगले आणि सांगली लढण्याचा निर्णय घेतला. 


राजू शेट्टींनी मातोश्रीवर दोनवेळा भेट घेऊनही .........