बातम्या

तलाठी भरती परीक्षा राज्य लोकसेवा आयोगाकडून घ्या राजू शेट्टी यांची मागणी

Raju Shettys demand to take Talathi recruitment exam from State Public Service Commission


By nisha patil - 8/1/2024 4:01:23 PM
Share This News:



तलाठी भरती परीक्षा राज्य लोकसेवा आयोगाकडून घ्या राजू शेट्टी यांची मागणी

राज्य सरकारने सरळ सेवा पद्धतीने तलाठी भरती प्रक्रियेच्या परीक्षा घेण्यात आल्या यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले असल्याचे निदर्शनास आले परीक्षा दिलेल्या अनेक विद्यार्थ्यांना 200 मार्कांच्या पेपरला 214 मार्क पडले असल्याचे प्रकार समोर आल्याने परीक्षा कशा पारदर्शक पद्धतीने झाल्या असतील हे दिसून येते

यामुळे सर्व भरती प्रक्रिया महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाकडून घ्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली आहे

गेल्या अनेक वर्षांपासून सरळ सेवा भरती प्रक्रियेमध्ये ज्या कंपनीमार्फत पेपर घेतले जातात त्या घोटाळा करतातच हे बऱ्याच वेळेस सिद्ध झाले आहे यामुळे शासनाने परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत आता सुद्धा तलाठी भरती प्रक्रियेत मोठा घोटाळा झालेला असून त्यामुळे हुशार होतकरू व सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे


तलाठी भरती परीक्षा राज्य लोकसेवा आयोगाकडून घ्या राजू शेट्टी यांची मागणी