बातम्या
सरकार आणि साखर कारखानदारांना गुडघे टेकायला लावू राजू शेट्टींचा इशारा
By nisha patil - 11/23/2023 6:18:18 PM
Share This News:
ऊस दराची मागणी मान्य न झाल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एल्गार सुरू आहे पुणे बेंगलोर महामार्गावर कोल्हापुरात स्वाभिमानी कडून बेमुदत चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे
राजू शेट्टी यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन साखर कारखानदार व विरोधी पक्ष सरकारला सुबुद्धी दे असे श्री अंबाबाईला साकडे घालून हायवेवर चक्काजाम आंदोलन सुरु केलं आहे. ऊस दरासाठी आज 23 नोव्हेंबर 2023 रोजी शिरोली पुलावर पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सकाळी अकरा वाजल्यापासून बेमुदत रास्ता रोको आंदोलन सुरू आहे.आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर राजू शेट्टी यांनी सांगितले की, शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत शेतकऱ्यांसाठी लढत राहणार आहे. आमच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतलं आहे.मात्र, शेतकरी भावांनो मिळेल त्या वाटेने पोलिसांना चुकून महामार्गावर या. सरकार आणि साखर कारखानदारांना गुडघे टेकायला लावू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. गतवर्षीच्या उसाला प्रतिटन शंभर रुपये साखर कारखान्यांनी आणि तीनशे रुपये सरकारने द्यावेत, कारखान्यांनी शंभर रुपयांपेक्षा जादा रकमेचा दुसरा हप्ता द्यावा आणि खुशाल साखर कारखाने सुरू करावेत, असे आवाहन शेट्टी यांनी केले आहे तसेच शिरोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती सचिन शिंदे यांना आज पहाटे शिरोळ पोलिसांकडून अटक झाली आहे आजचे चक्काजाम आंदोलन चिरडण्याचा सरकारचा डाव आहे अशी संघटनेची टीका आहे.
सरकार आणि साखर कारखानदारांना गुडघे टेकायला लावू राजू शेट्टींचा इशारा
|