बातम्या
'शक्तीपीठ'साठी शक्ती लावणाऱ्यांना राजू शेट्टींचा इशारा
By nisha patil - 9/20/2024 7:01:17 PM
Share This News:
राजू शेट्टी यांना रस्ते विकास महामंडळाकडून कोल्हापूर जिल्ह्यातून शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत असल्याने पाचपट मोबदला देण्यात येईल, अस पत्र देण्यात आले होते. ते पत्र समोर आल्यानंतर शक्तीपीठ महामार्गावरून धूळफेक सुरु आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावर राजू शेट्टी म्हणाले की, शक्तीपीठ महामार्गाला स्थगिती देण्याचा घोषणा झाल्या. रस्ते विकास महामंडळाला महामार्गासाठी एकूण खर्च, डीपीआर काय हे समजून घेण्यासाठी पत्र दिलं होतं. त्याचं उत्तर त्यांनी दिलं, त्यात ते म्हणाले 86 हजार कोटी खर्च येणार आहे. त्याचबरोबर पत्रात अस म्हटलं आहे की, समृद्धीप्रमाणे मोबदला देण्याचं प्रस्तावित आहे, पण स्पष्टता देण्यात आलेली नाही. केवळ प्रस्तावित आहे असं म्हणून शेतकऱ्यांची फसवणूक होवू देणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.आहे
'शक्तीपीठ'साठी शक्ती लावणाऱ्यांना राजू शेट्टींचा इशारा
|