बातम्या
बहिण भावाच्या नात्याचा गोड सण “रक्षाबंधन”
By nisha patil - 8/30/2023 7:49:37 AM
Share This News:
हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीने फार आधीपासुन या बहिण भावाच्या नात्याला सुरेख पध्दतीने चित्रीत केले आहे. या गोष्टींचे आज रक्षाबंधन या सणाच्या निमीत्ताने प्रकर्षाने स्मरण होते आहे.
तसं पाहाता बहिण भावाच्या पवित्र नात्याला शब्दबध्द करणं तसं अवघड काम. कारण या नात्यामधे काय नाही? प्रेम आहे, आपुलकी आहे, वात्सल्य आहे, प्रसंगी वाद भांडण आणि मारामारी देखील! पण या उदात्त नात्याची सर इतर कोणत्याही नात्याला नाही हे नक्की!
दिवाळीला साजरी होणारी भाउबीज आणि श्रावणात साजरा होणारा रक्षाबंधन (राखीपौर्णिमा) तसे अगदी सारखेच. बहिण भावाच्या नात्याला अधोरेखीत करणारे हे उत्सव.बहिण भाऊ जवळ असले तर ठिकच अन्यथा रक्षाबंधनाच्या या सणाला भाऊ बहिणीकडे किंवा बहिण भावाकडे जाऊन त्याला राखी बांधते आणि भाऊ देखील तीचे रक्षण करण्याचे वचन देतो एकमेकांना त्यांच्या आवडत्या वस्तु भेटस्वरूपात देखील दिल्या जातात.
मुळात उत्तर भारतात साजरा होणारा हा सण आता सर्वत्र साजरा होत असल्याचे आपण पाहातो.
रक्षाबंधनाची प्रथा कधीपासुन सुरू झाली याबाबत निश्चित काळ जरी माहित नसला तरी देखील अनेक कथा या सणाशी जोडल्या गेल्या आहेत.
बहिण भावाच्या नात्याचा गोड सण “रक्षाबंधन”
|