बातम्या
रामोजी राव यांच्या पार्थिवावर आज रामोजी फिल्म सिटी येथे अंत्यसंस्कार
By nisha patil - 10/6/2024 3:32:00 PM
Share This News:
देशातील नामवंत उद्योगपती आणि रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक, माध्यम सम्राट रामोजी राव यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर देशभरातील दिग्गजांनी शोक व्यक्त करत आंदरांजली वाहिली.पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक बड्या राजकीय नेत्यांनी व सेलिब्रिटींनी रामोजी राव यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आपल्या भावना मांडल्या. रामोजी राव यांच्या पार्थिवावर आज रामोजी फिल्म सिटी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
तेलंगणा सरकारने शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, आज तेलंगणा व आंध्र प्रदेशमधील बड्या राजकीय नेत्यांच्या व सेलिब्रिटींच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.रामोजी फिल्म सिटीमध्ये टीडीपीचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी रामोजी राव यांच्या पार्थिवाला खांदा दिला.
राव यांच्या कुटुंबातील सदस्यांसमवेत चंद्राबाबू नायडू अंत्यसंस्कारात सहभागी झाले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती भवन परिसरात जय्यत तयारी सुरू आहे. टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू हेही या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत.तत्पूर्वी आज रामोजी राव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यासाठी, चंद्राबाबू नायडू आवर्जून उपस्थित होते. त्यांनी रामोजी राव यांच्या पार्थिवास खांदा देत निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले.दरम्यान, रामोजी राव यांच्या निधनानंतर बॉलिवूडसह दक्षिण भारतातील सेलिब्रिटींनी सोशल मीडियातून दु:ख व्यक्त केलं. महेश बाबू, रितेश देशमुख, जेनेलिया देखमुख यांनीही शोक व्यक्त करत आठवणींना उजाळा दिला.
रामोजी राव यांच्या पार्थिवावर आज रामोजी फिल्म सिटी येथे अंत्यसंस्कार
|