बातम्या

रणबीर कपूरचा रामायण वादाच्या भोवऱ्यात

Ranbir Kapoors Ramayana in controversy


By nisha patil - 10/5/2024 4:59:33 PM
Share This News:



नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण या सिनेमाच्या चित्रीकरणाला सध्या सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे या सिनेमाचं शुटींग सुरु होण्याआधीपासूनच हा सिनेमा बराच चर्चेत आलाय. सिनेमाच्या सेटवरील फोटोही मागच्या काळात व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं. रामायण सिनेमात रणबीर कपूर हा रामाच्या भूमिकेत दिसणार आहे, तसेच सई पल्लवी ही सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. ही सिनेमा तीन भागांमध्ये तयार केला जाणार आहे पण या सिनेमावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. 
 

प्रोडक्शन हाऊस अल्लू मंटेना मीडिया वेंचर एलएलपी यांचा दावा आहे की, रणबीर कपूरच्या रामायण या सिनेमाचं स्क्रिप्ट त्यांच्या प्रोजक्ट रामायण या सिनेमावर आधारित आहे. त्याचप्रमाणे या सिनेमाचे कॉपी राईट्सही आमच्याकडे असल्याचं या प्रोडक्शन हाऊसचं म्हणणं आहे. त्यामुळे सिनेमाच्या सध्याच्या प्रोडक्शन हाऊसने म्हणजेच प्राईम फोकस टेक्नॉलॉजी लिमिटेड या प्रोडक्शन हाऊसने जर या कंटेंटचा वापर केला तर ते कॉपीराईटचं उल्लंघन मानलं जाईल. अल्लू मंटेना मीडिया वेंचरने आपले कॉपीराईट सुरक्षित करण्यासाठी कायदेशीर कारवाईची देखील धमकी दिली आहे. पण सध्या तरी नितेश तिवारी आणि सह-निर्माता यशने या रिपोर्ट्सवर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.


रणबीर कपूरचा रामायण वादाच्या भोवऱ्यात