बातम्या
रंकाळा तलाव संवर्धन, सुशोभिकरणाच्या कामात हयगय नको : राजेश क्षीरसागर
By nisha patil - 11/8/2023 3:58:20 PM
Share This News:
रंकाळा तलाव संवर्धन, सुशोभिकरणाच्या कामात हयगय नको : राजेश क्षीरसागर
कोल्हापूरचे वैभव असलेल्या ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. रंकाळा तलावाच्या पुरातन वास्तुना कोणताही धोका होणार नाही. कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर होवून वर्षभराचा कालावधी उलटला असून, काम संथ गतीने सुरु आहे. निधी असूनही काम थांबले असल्यास त्यात शासनाची बदनामी होणार असून, रंकाळा तलाव संवर्धन आणि सुशोभिकरणाच्या कामात कोणतीही हयगय करू नका, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिल्या. याबाबत .राजेश क्षीरसागर यांनी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता आणि पुरातत्व समितीच्या अध्यक्षा श्रीमती निंबाळकर यांच्याशी संपर्क साधून कायदेशीर बाबी तपासून तात्काळ परवानगी देण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी, कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासास प्रथमच रंकाळा तलावासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनीही रंकाळा तलावास भेट दिली असून, या ऐतिहासिक तलावाचे संवर्धन, सुशोभिकरण करण्यासाठी निधीची मागणी केली होती. त्यानुसार शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. रंकाळा तलावाच्या माध्यमातून एक चांगली डेव्हलपमेंट करून शहराच्या पर्यटन वाढीस चालना देण्याचा आपला उद्देश आहे. पुढील काळातही अधिकाधिक निधी आणून डेव्हलपमेंट करण्याची संधी आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी रंकाळा तलावाची कामे गांभीर्याने घ्यावीत. या कामात कोणतीही हयगय करू नये, अशा सूचना दिल्या.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, उपशहरप्रमुख धनाजी कारंडे, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपआयुक्त साधना पाटील, आर्कीटेक्ट रणजीत निकम यांच्यासह अधिकारी व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
रंकाळा तलाव संवर्धन, सुशोभिकरणाच्या कामात हयगय नको : राजेश क्षीरसागर
|