बातम्या

रणवीर सिंह हा शक्तिमानची भूमिका साकारणार असल्याच्या चर्चेला उधाण

Ranveer Singh is going to play the role of Shaktiman


By nisha patil - 3/18/2024 9:35:40 PM
Share This News:



शक्तिमान या कार्यक्रमाने 90 च्या दशकांत गाजलेल्या मालिकांच्या यादीत शक्तिमानचं नावही घेतलं जातं. 90च्या दशकांत शक्तिमान हा मुलांसाठी सुपरहिरो ठरला होता. अभिनेता मुकेश खन्ना  यांनी ही शक्तिमानची भूमिका साकारली होती. त्यातच हा शक्तिमान आता मोठ्या पडद्यावर येणार आहे. तसेच ही शक्तिमानची भूमिका रणवीर सिंह  साकारणार असल्याच्या चर्चा देखील मागील काही दिवसांपासून सुरु होत्या. पण यावर मुकेश खन्ना यांनी आक्षेप घेतला आहे. 

काही दिवसांपूर्वी एका मासिकासाठी रणवीर सिंहने न्यूड फोटोशूट केले होते. त्याच्या या न्यूड फोटोशूटमुळेही मुकेश खन्ना यांनी तो शक्तिमानची भूमिका साकारु शकत नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या शक्तिमानच्या भूमिकेवरुन कोणतं रामायण होणार याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे. तसेच रणवीर स्टार असला तरीही तो कधीच शक्तिमान बनू शकत नाही, असं देखील यावेळी मुकेश खन्ना यांनी म्हटलं.मुकेश खन्ना यांनी युट्युब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये त्यांनी रणवीर सिंह शक्तीमानची भूमिका साकारणार या चर्चांवरही तीव्र नाराजी व्यक्त केलीये. त्याच्या न्यूड फोटोशूटच्या मुद्द्यावरुन त्यांनी म्हटलं की,  रणवीर सिंह स्टार असला तरी तो कधीच शक्तिमान बनू शकत नाही.  जर त्याला शरीरप्रदर्शन करायचं असेल, तर त्याने दुसऱ्या देशात जाऊन अभिनय केला पाहिजे.


रणवीर सिंह हा शक्तिमानची भूमिका साकारणार असल्याच्या चर्चेला उधाण