बातम्या

रश्मी शुक्ला राज्याच्या पोलीस महासंचालकपदी, कारण...

Rashmi Shukla as Director General of Police of the state because


By nisha patil - 12/30/2023 3:07:56 PM
Share This News:



रश्मी शुक्ला राज्याच्या पोलीस महासंचालकपदी, कारण...

राज्याच्या पोलीस महासंचालकपदी 1988 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने आता त्यांच्या जागी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या डीजीपीपदी नियुक्ती झाली आहे. रश्मी शुक्ला या फोन टॅपिंग प्रकरणांमुळे वादात सापडल्या होत्या. 

2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या काळातील कथित फोन टॅपिंग प्रकरणी महाविकास आघाडी सरकारनं त्यांची चौकशी सुरु केली होती. एकनाथ खडसे, संजय राऊत, नाना पटोले, आशिष देशमुख आणि बच्चू कडू यांचे फोन टॅप करण्यात आल्याची माहिती तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत देखील दिली होती.


रश्मी शुक्ला राज्याच्या पोलीस महासंचालकपदी, कारण...