बातम्या

राष्ट्र सेवा दलाचे गुणवंत शिक्षक - सेवक पुरस्कार जाहीर

Rashtra Seva Dal Meritorious Teacher Servant Award announced


By nisha patil - 11/29/2024 12:00:28 PM
Share This News:



राष्ट्र सेवा दलाचे गुणवंत शिक्षक - सेवक पुरस्कार जाहीर

इचलकरंजी : प्रतिनिधी येथील राष्ट्र सेवा दलाच्या वतीने महात्मा जोतिराव फुले पुण्यतिथीनिमित्त 
साने गुरुजी शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून गुणवंत शिक्षक - सेवक पुरस्कार आणि साने गुरुजी प्रेरणा पुरस्कार जाहीर करण्यात आले.गुणवंत शिक्षक - सेवक पुरस्कारामध्ये  मध्ये गीता खोचरे, (मुख्याध्यापक, आदर्श विद्यामंदिर), प्रमोद कोळेकर , (कला शिक्षक, द न्यू हायस्कूल), सीमा नेजे , (ग्रंथपाल, गंगामाई गर्ल्स हायस्कूल) , रामचंद्र पाटील (ग्रंथपाल, आंतरभारती विद्यालय) यांचा समावेश आहे.

 

तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने शिक्षकांसाठी दिला जाणारा जागर पुरस्कार बालाजी हायस्कूलचे कुमार कांबळे यांना जाहीर करण्यात आला आहे.हा पुरस्कार  वितरण कार्यक्रम आंतरभारती शिक्षण मंडळ ,कोल्हापूरचे सचिव एम. एस. पाटोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि डाॅ. बी. एम. हिर्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि 1 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजी या ठिकाणी संपन्न होणार आहे. तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे समन्वयक अशोक चौगुले, इंद्रायणी पाटील ,शरद वास्कर यांनी केले आहे.


राष्ट्र सेवा दलाचे गुणवंत शिक्षक - सेवक पुरस्कार जाहीर