बातम्या

मराठा आरक्षणासाठी वाघबीळ घाटात रास्ता रोको आंदोलन

Rasta Roko Andolan at Waghbeel Ghat for Maratha reservation


By nisha patil - 10/23/2023 4:13:58 PM
Share This News:



मराठा आरक्षणासाठी वाघबीळ घाटात रास्ता रोको आंदोलन  

मनोज जरांगेच्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रास्ता रोको आंदोलन

पन्हाळा आणि कोडोली पोलिस ठाण्याकडून वाघबीळ फाट्यावर जबरदस्त बंदोबस्त तैनात

मराठ्यांना आरक्षण मिळावे, पन्हाळ्यावर सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला आणि मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पन्हाळा तालुका सकल मराठा बांधवांच्या वतीने रविवारी   सकाळी वाघबीळ येथे अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देऊन आरक्षणाबाबत सरकारच्या वेळकाढू धोरणाचा निषेध केला. पन्हाळा आणि कोडोली पोलिस ठाण्याकडून वाघबीळ फाट्यावर जबरदस्त बंदोबस्त तैनात केला होता.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जाफळे  येथील वसंत पाटील आणि सुरेश जगदाळे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी रविवारी पन्हाळ्यातील सकल मराठा बांधवांनी वाघबीळ येथे रविवारी सकाळी अकरा वाजता रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे कोल्हापूर, पन्हाळा, जोतिबा आणि रत्नागिरीकडे जाणारी वाहतूक अर्धा तास ठप्प झाली होती. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबपर्यंत मोठ्या रांगा लागल्या होत्या.
     यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देत सकल मराठा बांधव आक्रमक झाले होते. पोलिसांच्या विनंतीनंतर रास्ता रोको आंदोलन मागे
घेण्यात आले. त्यानंतर आंदोलकांनी पन्हाळ्यावर सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी वाघबीळ ते पन्हाळा तहसील कार्यालयापर्यंत मोटारसायकलने रॅली काढली.
        यावेळी माजी आमदार सत्यजित पाटील, गोकुळचे संचालक चेतन नरके, शिवसेना तालुकाध्यक्ष बाबासाहेब पाटील, मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील, प्रदीप जाधव, अमर भोसले, चेतन भोसले, रवींद्र धडेल, रवी तोरसे, महेश पाटील, पन्हाळा पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड, उपनिरीक्षक बी. बी. मलगुडे आदींसह सकल मराठा समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


मराठा आरक्षणासाठी वाघबीळ घाटात रास्ता रोको आंदोलन