बातम्या

शहाणपणानं वागावं' म्हणत राऊतांचा 'मनसे'ला टोला

Rauts challenge to MNS is to act wisely


By nisha patil - 12/19/2023 5:00:28 PM
Share This News:



शहाणपणानं वागावं' म्हणत राऊतांचा 'मनसे'ला टोला 

उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता सूचक शब्दांमध्ये राज ठाकरेंच्या पक्षाला टोला लगावला आहे. पत्रकार परिषदेमध्ये सध्या मनसेकडून लोकसभेसाठीच्या निवडणुकीची तयारी आणि जागांसंदर्भातील चाचपणी सुरु आहे. याचाच संदर्भ घेऊन शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर बोलताना राऊत यांनी राज्यात भूमिका बदलणारे पक्ष आहेत, असा टोला लगावला. 
   

"राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष लोकसभेची तयारी करतोय. राज ठाकरे आज 22 मतदारसंघासाठीची आढावा बैठक मुंबईत घेत आहेत," असं म्हणत राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी अन्य पक्षांचाही उल्लेख करत मनसेला टोला लगावला. "बरोबर आहे, भारतीय जनता पक्षाला मदत होणं गरजेचं आहे. मी त्यांच्याविषय म्हणत नाही पण एमआयएम असेल, अन्य काही आघाड्या असतील त्यांचा हा वर्षानूवर्षाचा कार्यक्रम आहे. खास करुन मागील 10 वर्षांचा. हुकूमशाहीविरुद्ध बोलायचं. केंद्रातल्या सरकारला शिव्या घालायच्या, मात्र काही करण्याची लढण्याची वेळ आली की वेगळ्या भूमिका घ्ययाच्या. आपल्या देशात आणि राज्यात अनेक संघटना आणि पक्ष अशा वेगळ्या भूमिका घेतात," असं संजय राऊत मनसेसंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.


शहाणपणानं वागावं' म्हणत राऊतांचा 'मनसे'ला टोला