बातम्या

 मुसळधार पावसामुळे राऊतवाडी धबधब्याने घेतले रौद्ररूप 

Rautwadi waterfall turned red due to heavy rain


By nisha patil - 7/19/2023 1:45:39 PM
Share This News:



 मुसळधार पावसामुळे राऊतवाडी धबधब्याने घेतले रौद्ररूप 

तारा न्यूज वेब टीम :  दोन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे राऊतवाडी धबधब्याच्या प्रवाहात प्रचंड वाढ झाली असून धबधब्याने रौद्ररूप धारण केले आहे. त्यामुळे पर्यटकांनी वर्षा पर्यटनासाठी मोह टाळावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पाणलोट क्षेत्रात १११ मी.मी पावसाची नोंद झाली असून. आजतागायत १३५५ मि. मी पावसाची नोंद झाली आहे. सध्या राधानगरी धरणामध्ये पाणी पातळी ३२५.७४ तर पाणीसाठा-४८७५.१९ द.ल.घ.फू (४.८७ टी.एम.सी.) आहे. धरणातून १००० क्युसेक इतका विसर्ग भोगावती नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होवून कोणत्याही क्षणी रस्ते बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटकांनी पर्यटनासाठी बाहेर पडू नये असे आवाहन निसर्गप्रेमी तसेच प्रशासनाकडून करण्यात आले आहे. धबधब्याचा प्रवाह मोठा असल्याने पर्यटकांनी काळजी घ्यावी.


 मुसळधार पावसामुळे राऊतवाडी धबधब्याने घेतले रौद्ररूप