विशेष बातम्या

राशाचं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर रवीनानं एक खास पोस्ट सोशल केली मीडियावर शेअर

Raveena shared a special post on social media after Rashas graduation


By nisha patil - 5/31/2023 5:14:34 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडनची  मुलगी राशा थडानीने नुकतेच तिचे ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. राशा थडानी ही मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून  पदवीधर झाली आहे. राशाचं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर रवीनानं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर करुन आनंद व्यक्त केला आहे. 
रवीनानं राशाच्या बालपणाचे काही फोटो आणि तिचे ग्रॅज्युएशन झाल्यानंतरचे फोटो  सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रवीनानं या फोटोला 'Time Flies...that’s true' असं कॅप्शन दिलं आहे. रवीनानं शेअर केलेल्या राशाच्या फोटोला अनेकांनी कमेंट्स करुन शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री नीलम कोठारी, अभिनेता   विक्रांत मॅसी या कलाकारांनी रवीनानं शेअर केलेल्या फोटोला कमेंट करुन राशाला शुभेच्छा दिल्या आहेत. .राशानं इन्स्टाग्रामवर तिच्या 'ग्रॅज्युएश-डे'चे काही फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये राशाचे काही मित्र-मैत्रिणी देखील  दिसत आहेत. या फोटोला राशानं 'स्कूल आऊट' असं कॅप्शन दिलं आहे.


राशाचं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर रवीनानं एक खास पोस्ट सोशल केली मीडियावर शेअर