बातम्या

हद्दपार करुनही कार्यक्षेत्रात दिसल्याने कारवाई - रवींद्र कळमकर

Ravindra kalmkar


By nisha patil - 12/4/2024 10:55:46 PM
Share This News:



पांडुरंग फिरींगे कोल्हापूर :प्रतिनिधी कोल्हापूर शहर व परिसरामध्ये अवैध व्यवसाय करणारी "मटका किंग गँग" या टोळीचा प्रमुख विजय लहु पाटील व त्याचे टोळीतील सक्रिय साथीदार यांचे विरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ प्रमाणे टोळी हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक राजवाडा पोलीसठाणे यांनी कोल्हापूर जिल्हयाचे  पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित यांचेकडे सादर केला होता. सुनावणी अंती टोळीच्या वाढत्या अवैध व्यवसायाला आळा घालण्यासाठी व त्यांचे परिसरातील वास्तव्यामुळे बाधीत झालेले सामाजिक स्वास्थ पुनःप्रस्थापित करण्यासाठी, सार्वत्रीक हित लक्षात घेवुन “मटका किंग” या टोळीच्या प्रमुखासह १२ इसमांचेवर कोल्हापूर जिल्हयातुन एक वर्षाचे

कालावधी कारीता हद्दपारीची कारवाई करुन व आदेशाची बजावणीही केलेली आहे.नमुद टोळीतील हद्दपार इसम नामे नंदकुमार पंडीतराव चोडणकर  हा मनाई केलेल्या कार्यक्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता प्रवेश केलेला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर यांना मिळाली. मिळालेल्या बातमी प्रमाणे नमुद इसमांचा शोध घेवुन ताब्यात घेवुन कायदेशिर कारवाई करणे बाबत, त्यानी सहा पोलीस निरीक्षक श्री वाघ व पोलीस अमंलदार यांना आदेश दिले होते.
नमुद इसमांची माहिती घेतली असता, तो फुलेवाडी नाका येथे असल्याचे समजुन येताच त्यास सहा
पोलीस निरीक्षक सागर वाघ व त्यांचे समवेत असलेले पोलीस अमंलदार यांनी ताब्यात घेवुन त्याचे
विरुध्द जुनाराजवाडा पोलीस ठाणेस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करुन,
त्यास पुढील कार्यवाही करीता राजवाडा पोलीस ठाणेच्या स्वाधीन केले आहे.
 

सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे, पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचे
मार्गदर्शना प्रमाणे सहा पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस अमंलदार संजय कुंभार, संतोष पाटील
यांनी केलेली आहे.
 

या व अशा कोल्हापूर जिल्हयातुन हद्दपारीची कारवाई केलेले इसम जर कोणास आढळुनआलेस त्यानी संबंधीत पोलीस ठाणेस अथवा नियंत्रण कक्ष ०२३१-२६६२३३३ येथे संपर्क करुन
माहिती द्यावी. माहिती देणा-याचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे अवाहन  महेंद्र पंडित, पोलीस
अधीक्षक  कोल्हापूर यांनी नागरीकांना केले आहे.


हद्दपार करुनही कार्यक्षेत्रात दिसल्याने कारवाई - रवींद्र कळमकर