ताज्या बातम्या
काँग्रेसच्या विधान परिषद गटनेतेपदी आमदार सतेज पाटील यांची फेरनिवड
By nisha patil - 1/3/2025 8:41:38 PM
Share This News:
काँग्रेसच्या विधान परिषद गटनेतेपदी आमदार सतेज पाटील यांची फेरनिवड
कोल्हापूर : माजी गृहराज्यमंत्री व विधान परिषद सदस्य आमदार सतेज पाटील यांची काँग्रेसच्या विधान परिषद गटनेतेपदी फेरनिवड करण्यात आली.अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेने काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनीही नियुक्ती केल्याची जाहीर केले.
आमदार सतेज पाटील यांनी जिल्ह्यात पक्ष संघटना वाढीस चालना दिली आहे. ते, 2009- 14 च्या आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री होते त्याचबरोबर 2019 च्या महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी गृहराज्यमंत्री, ग्रामविकास, परिवहन, माजी सैनिक कल्याण, गृहनिर्माण, संसदीय कार्य, माहिती आणि तंत्रज्ञान, अन्नऔषध अशा विविध खात्यांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर सतेज पाटील यांनी काँग्रेसला चालना दिली. भारत जोडो यात्रेचे अत्यंत नाविन्यपूर्ण पद्धतीने प्रसारण करून श्री पाटील यांनी सर्व काँग्रेस जनांचे लक्ष वेधले होते.
काँग्रेसच्या विधान परिषद गटनेतेपदी आमदार सतेज पाटील यांची फेरनिवड
|