बातम्या
मनोज जरांगे यांच्यावर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया म्हणाले...
By nisha patil - 1/26/2024 7:14:52 PM
Share This News:
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली निघालेलं भगवे वादळ आता मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपले आहे. वाशीमध्ये मनोज जरांगे यांची भव्य सभा होणार आहे. त्यानंतर ते मुंबईकडे रवाना होणार आहेत. त्याआधी राज्य सरकारकडून तोडगा काढण्यासाठी दोन जणांचं शिष्टमंडळ पाठवण्यात आले. मनोज जरांगे आणि शिष्टमंडळामध्ये चर्चा झाली आहे. थोड्याच वेळात मनोज जरांगे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्याआधीच राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं महत्वाचं विधन समोर आले आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्या,असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तर मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा असल्याचं अजित पवार यांनी सांगितलेय. एकनाथ शिंदेंचा मनोज जरांगेंशी संवाद, योग्य ते समाधान येईल असे सूचक विधान मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही केलेय.
यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली ते म्हणाले न्यायालयाने सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते नागपुरात बोलत होते. उच्च न्यायालयाने आम्हाला जे निर्देश दिले आहेत, कोणालाही आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आंदोलन शांततेने आणि नियमाने झालं पाहिजे असे उच्च न्यायालयाने सांगितले. न्यायालयानं सांगितल्याप्रमाणे तंतोतंत पालन करू. त्यासोबत जे प्रश्न आहेत ते प्रश्न कसे सोडवता येतील. याकरिता माननीय मुख्यमंत्र्यांचे नेतृत्वात प्रयत्न सुरू आहेत, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अजित पवार काय म्हणाले ?
पुण्यात ध्वजारोहण झाल्यानंतर उप मुख्यमंत्री अजित पवार यांनीही मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया दिली. मराठी आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, असे ते म्हणाले. नवी मुंबईत शिष्टमंडळ आहे . मार्ग काढायचा प्रयत्न सुरू आहे. कुणी काय म्हटले ते मला सांगू नका? राज्य प्रमुखांनी त्यात लक्ष घातलं आहे, असे अजित पवार म्हणाले.
मनोज जरांगे यांच्यावर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया म्हणाले...
|