बातम्या
विवेकानंद कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन समारंभ संपन्न
By nisha patil - 10/15/2024 7:31:12 PM
Share This News:
येथील विवेकानंद कॉलेजमधील ग्रंथालय, मराठी, एन.सी.सी. व एन.एस.एस. विभाग यांच्या संयुक्त् विद्यमाने 'डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंती व वाचन प्रेरणा दिन' साजरा करण्यात आला.
यावेळी शिवाजी विद्यापीठ परिपत्रकानुसार स्वराज्य् संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने राज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन असणाऱ्या मजकूराचे वाचन विद्यार्थी व प्राध्यापक यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभागप्रमुख डॉ. एकनाथ आळवेकर हे होते. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.आर.कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
अध्यक्षीय मनोगतात डॉ. आळवेकर यांनी ग्रंथालये मन घडविण्याचे काम करतात. मनाला समृद्ध करतात. पुस्तकामुळे अनर्थ घडल्याचा इतिहास नाही, त्यामुळे पुस्तकांचा नंदादीप सतत तेवत ठेवला पाहिजे. प्रत्येक घरात भौतिक सुविधा आहेत पण पुस्तके बघायला नाहीत हे आपले दुर्दैव आहे. मंदिराकडे जाणाऱ्या रांगा ज्यावेळी ग्रंथालयाकडे वळतील तेव्हाच खऱ्या अर्थाने भारत महासत्ता होईल असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाची सुरवात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमपूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत ग्रंथपाल डॉ.सौ. निता पाटील यांनी केले. आभार डॉ. प्रदीप पाटील यांनी मानले.
यावेळी एन.एस.एस.कार्यक्रम अधिकारी प्रा.संदीप पाटील, एन.सी.सी. प्रमुख प्रा.मेजर सुनिता भोसले, लेफटनंट प्रा.जे.आर.भरमगोंडा, प्रा. रोहिणी रेळेकर, प्रा.अभिजीत कदम, प्रा योगेश माने, रजिस्टार श्री.आर.बी.जोग, ग्रंथालय स्टाफ व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
विवेकानंद कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन समारंभ संपन्न
|