बातम्या
शहाजी महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन संपन्न
By nisha patil - 10/15/2024 7:26:39 PM
Share This News:
कोल्हापूर: श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेतील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात आज मंगळवारी डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांच्या 93 व्या जयंती दिनानिमित्त वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने शिवराज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन तसेच डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्यावरील पुस्तकांच्या मधील उताऱ्यांचे वाचन विद्यार्थ्यांनी केले. संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण यांचे या उपक्रमास प्रोत्साहन मिळाले.
आय क्यू ए सी समन्वय डॉ. आर.डी..मांडणीकर, डॉ.ए.बी.बलुगडे, डॉ.डी. एल. काशीद पाटील, प्रा. ऐश्वर्या हिंगमिरे,प्रा.जी.डी.काटकर प्रा. प्रतिमा शिंदे, डॉ. के .एम.देसाई, डॉ.शिवाजी जाधव डॉ. रचना माने, प्रा .अर्जुन कांबळे डॉ. पल्लवी कोडग, डॉ.शोभा चाळके,प्रा.शुभम पाटील, विद्यार्थी समीक्षा शरद माने, राहुल एकशिंगे, वैष्णवी जगताप ,इमर खान, रोहन पाटील, अर्चना कदम यांनी अब्दुल कलाम यांच्या पुस्तकांचे वाचन केले. स्वागत व प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.डी के वळवी यांनी केले.संयोजन ग्रंथपाल डॉ. पांडुरंग पाटील यांनी केले. डॉ. डी एल काशीद पाटील यांनी आभार मानले.
महाविद्यालयाचे प्रबंधक रवींद्र भोसले,अधिक्षक्ष मनीष भोसले, प्रशासकीय सहकारी, सर्व प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थिनी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्यावरील ग्रंथांचे प्रदर्शन देखील यावेळी संपन्न झाले. सहाय्यक ग्रंथपाल सौ शोभा साळुंखे सौ मंजिरी भोसले सुहास टिपुगडे गणेश पाटील विजय लाड बाळासाहेब इंगवले दीपक गुरव यांनी संयोजन केले.
शिवाजी ग्रंथालय ,सांस्कृतिक विभाग ,एनएसएस विभाग, एनसीसी विभाग यांनी या उपक्रमाचे संयोजन केले.
शहाजी महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन संपन्न
|