बातम्या
झोपण्यापूर्वी पुस्तक वाचणे अतिशय फायदेशीर
By nisha patil - 11/6/2023 9:38:12 AM
Share This News:
आधुनिक काळात सर्वच वयोगटातील व्यक्तींना झोपेची समस्या सतावते पूर्वी लहान मुले झोपत नसतील तर माता त्यांना एखादी गोष्ट सांगून झोपवण्याचा प्रयत्न करत असत आता एका नवीन संशोधनाप्रमाणे चांगली झोप यावी असे वाटत असेल तर झोपण्यापुर्वी एखाद्या आवडत्या पुस्तकाचे वाचन करणे अतिशय फायदेशीर ठरते.
2021 मध्ये घेण्यात आलेल्या रीडिंग ट्रायल नावाच्या एका ऑनलाइन सर्वेमधील हे निष्कर्ष जाहीर करण्यात आले असून झोपण्यापूर्वी आपल्या आवडत्या पुस्तकाचे वाचन करणाऱ्या 42 टक्के लोकांना चांगली झोप आली एखादे योगासन करून किंवा एखादा विनोदी कार्यक्रम बघून जेवढा दिलासा मिळतो तेवढाच दिलासा झोपण्यापूर्वी किमान अर्धातास पुस्तकाचे वाचन केल्यामुळे मिळू शकतो आणि शांत झोप लागते असे या सर्व्हेतून समोर आले आहे.
काही लोकांना निद्रानाशाचा विकार असतो कितीही प्रयत्न केले तरी अशा लोकांना झोप येत नाही पण जर अशा लोकांनी आपल्या आवडत्या पुस्तकाचे वाचन करण्याची सवय लावून घेतली तर त्यांना निद्रानाशापासूनही मुक्ती मिळू शकते असा दावा या सर्वेमध्ये करण्यात आला आहे झोपण्यापूर्वी पुस्तकाचे वाचन केल्यामुळे झोपेचा कालावधीही वाढतो अधून-मधून झोप मोडण्याचे प्रकार कमी होतात आणि सलग झोप लागते.
त्यामुळे सकाळी उठल्यावर खूपच फ्रेश आणि ताजेतवाने वाटू शकते रात्री झोपण्यापूर्वी मोबाईलवर कार्यक्रम पाहणे किंवा व्हिडिओ पाहण्याचा छंद अनेकांना असतो पण अशा प्रकारच्या सवयी घातक ठरू शकतात त्याऐवजी झोपण्यापूर्वी पुस्तकाचे वाचन करावे असा सल्ला आरोग्य तज्ञांनी दिला आहे
झोपण्यापूर्वी पुस्तक वाचणे अतिशय फायदेशीर
|