बातम्या
शाहुवाडीतून यावर्षी एमबीबीएस साठी रेकॉर्ड ब्रेक प्रवेश
By nisha patil - 2/9/2024 7:05:38 PM
Share This News:
मलकापूर प्रतिनिधी दि.२ शाहूवाडी तालुका केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग या परीक्षेतून जास्तीत जास्त अधिकारी होणारा तालुका म्हणून ओळखला जातो पण यावर्षी शाहुवाडी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी मेडिकल प्रवेशासाठी अवघड समजल्या जाणाऱ्या नीट परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील नामवंत वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस साठी प्रवेश मिळाला आहे .या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये पुजा शिवाजी रोडे पाटील (ग्रँट गव्हर्मेंट मेडीकल कॉलेज मुंबई) श्रेयस संजय जगताप (हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कुपर गव्हर्मेंट मेडीकल कॉलेज मुंबई) श्रावणी जयप्रकाश पाटील (G.T. गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मुंबई) मधुरा दिनकर पाटील (गव्हर्मेंट मेडीकल कॉलेज सोलापूर) विश्वतेज विलास बंडगर (गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज सोलापूर) सोहम संभाजी हनवते (राजीव गांधी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज ठाणे) यश दिवाण वसावे (टोपीवाला गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मुंबई) समर्थ शंकर मगदुम (मेडीकल कॉलेज कुडाळ सिंधुदुर्ग),प्रज्वल बाबासो साळोखे (वालावलकर मेडीकल कॉलेज चिपळूण रत्नागिरी) या गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे हे सर्व विद्यार्थी शाहुवाडी तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची मुले आहेत या यशाबद्दल विद्यार्थी पालक यांचे शाहूवाडी तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी विश्वास सुतार आणि शिक्षण विस्तार अधिकारी आनंदराव सुतार अभिनंदन केले आहे.
शाहुवाडीतून यावर्षी एमबीबीएस साठी रेकॉर्ड ब्रेक प्रवेश
|