शैक्षणिक
10वी, 12वी विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची नियुक्ती
By nisha patil - 10/2/2025 7:12:20 PM
Share This News:
10वी, 12वी विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची नियुक्ती
कोल्हापूर, दि. 10 - 10वी व 12वी परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना मानसिक दडपणातून मुक्त करण्यासाठी राज्य मंडळाने ऑनलाईन समुपदेशनासाठी समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. हे समुपदेशक परीक्षेपूर्वी आणि परीक्षा कालावधीत सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत मोफत मार्गदर्शन करणार आहेत.
राज्य मंडळाच्या सचिव डॉ. माधुरी सावरकर यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था व प्रश्नपत्रिकेसंबंधी विचारणा न करण्याचे आवाहन केले आहे.
यंदा 12वी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 आणि 10वी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत राज्यातील सर्व विभागीय मंडळांमार्फत आयोजित करण्यात आली आहे.
विद्यार्थी आणि पालकांनी समुपदेशकांशी 9011302997, 8263876896, 8767753069, 7387400970, 9960644411, 7208775115, 8169202214, 9834084593, 8329230022, 9552982115 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन कोल्हापूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी केले आहे.
10वी, 12वी विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची नियुक्ती
|