बातम्या

रत्नागिरीला रेड तर पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी

Red alert for Ratnagiri and orange alert issued for Palghar


By nisha patil - 8/7/2024 5:42:44 PM
Share This News:



कोकणात आज काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे.  रत्नागिरी, सिंधुदुर्गासाठी रेड अलर्ट  तर पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट असल्याने अनेक भागात सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन आणि आपत्ती विभागांकडून देण्यात आलेल्या आहेत.  उद्या देखील कोकणात सर्वत्र मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
 

कोकणात  अनेक भागात सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन आणि आपत्ती विभागांकडून देण्यात आलेल्या आहेत. रायगडच्या समुद्राला उधाण आले आहे. दुपारनंतर समुद्रामध्ये उंच लाटा उसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होताच. काही तासांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवला आहे. दरम्यान, मच्छीमारांना अजिबात समुद्रात जाऊ नये अशी सूचना प्रशासनानं दिल्या आहेत. 
 

पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून विजांच्या कडकडाटासह वाऱ्यांचा वेग 50-60  किमी प्रति तास राहण्याचा अंदाज आहे. उद्या देखील कोकणात सर्वत्र मुसळधार पावसाचा अंदाज आहे.  मुंबईत आज अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे


रत्नागिरीला रेड तर पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी