बातम्या

इंग्रजी शाळांच्या दप्तरांचे ओझे कमी करा : युवा सेना ठाकरे गट

Reduce the burden on English schools offices


By nisha patil - 1/8/2023 7:40:14 PM
Share This News:



इंग्रजी शाळांच्या दप्तरांचे ओझे कमी करा : युवा सेना ठाकरे गट

शासकीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी झालं असलं तरी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराचं ओझं कायम आहे अद्याप भलं मोठं दप्तराचं ओझं घेऊनच या विद्यार्थ्यांना शाळेत जावं लागतंय परिणामी अनेक शारीरिक त्रास विद्यार्थ्यांना जाणवू लागले आहेत. त्यामुळे मराठी शाळेप्रमाणेच इंग्रजी माध्यमातील शाळेच्या विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करावे अशी मागणी कोल्हापूर युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे याबाबतचे निवेदन युवा सेना जिल्हाप्रमुख मंजीत माने यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण उपनिरीक्षक रवींद्र चौगुले यांना देण्यात आलं.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने पहिली ते आठवीपर्यंत एकच पुस्तक ठेवला आहे या पुस्तकांमध्ये कोरी पाने जोडल्याने वेगळ्या वया आणि पुस्तक नेण्याची गरज नाही त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी झाले. मात्र इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पुस्तक आणि वयांच्या ओझाने भरलेले दप्तर विद्यार्थी घेऊन जात आहेत त्याचबरोबर इंग्रजी माध्यम शाळेतील विद्यार्थ्यांना आठवड्याला दोन-तीन गणवेश कशासाठी लागतात असा सवाल देखील म्हणजेच माने यांनी उपस्थित केला येत्या पंधरा दिवसात इंग्रजी माध्यम शाळेतील विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझेबाबत निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी मंजित माने यांनी दिला आहे. यावेळी शहर युवा अधिकारी संतोष कांदेकर लतीफ शेख चैतन्य देशपांडे प्रतीक भोसले सानिका दामूगडे प्रिया माने सिद्धी दामूगडे रुद्र चौगुले सार्थक जगताप यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


इंग्रजी शाळांच्या दप्तरांचे ओझे कमी करा : युवा सेना ठाकरे गट